vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये 30 संवर्गात 668 पदांसाठी सरळसेवेव्दारे होत असलेल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. 28 मार्च रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच 19 मे पर्यंत तब्बल 84,774 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

 प्राप्त अर्जांमध्ये सर्वाधिक 23347 अर्ज हे लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या 135 जागांसाठी प्राप्त झाले असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) संवर्गाच्या 51 जागांसाठी 15,447 तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या 83 जागांसाठी 14558 आणि स्टाफ नर्स / मिडवाईफ (G.N.M.) संवर्गाच्या 131 पदांसाठी 12,634 अर्ज प्राप्त झालेले आहेत.

 अर्ज दाखल करणा-या पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रिया संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in याला भेट द्यावी तसेच महानगरपालिकेचे अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मिडीया अकाऊंटला भेट द्यावी आणि सत्य व प्रमाणित माहिती जाणून घ्यावी. त्याचप्रमाणे याविषयी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला बळी पडू नये अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लेख ……गुरुपौर्णिमेचे महत्त्व ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोयपालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

vishwatmaklokswamivarta