vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्ली प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नवी दिल्ली प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नवी दिल्ली प्रतिनिधी 📍 नवी दिल्ली प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. भारत व्यापार वृद्धी संस्थेमार्फत (आयटीपीओ) आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दालनातील महाराष्ट्र राज्य हस्तकला आणि हातमाग महामंडळ, विविध स्वयंसहाय्यता गट, मराठी भाषा दालन, पैठणी कारागीर तसेच इतर स्टॉल्सची सविस्तर पाहणी केली. पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, घरसजावटीच्या वस्तू, हॅंड पेंटिंग, ऑरगॅनिक उत्पादने, काथ्यापासून बनवलेल्या वस्तू, खादी आणि बांबूच्या वस्तू तसेच बचत गटातील महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ आदी वस्तू प्रदर्शित करणाऱ्या स्टॉल्सना त्यांनी भेट दिली. स्टॉलधारकांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती घेतली.

राष्ट्रीय राजधानीत राज्याच्या उत्कृष्ट उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

हा मेळा २७ नोव्हेंबरपर्यंत चालेल. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा – अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावा..

विधानपरिषदकामकाज….

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद! सर्वांना ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच प्रवेश…

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची मुलगी आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन हिनं रचला नवा इतिहास. 

vishwatmaklokswamivarta

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश