vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

 

सांगली, प्रतिनिधी: जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील “सांगली पॅटर्न”अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची उमेद मिळाली. निमित्त होतं वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित तृतीयपंथीय उमेदवारांसाठी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं.

महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट हॉलमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा उद्योग अधिकारी ता. ना. खांडेकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, यंग प्रोफेशनल प्रवीण बनकर, कौशल्य विकास सहायक अमोल बोळाज, तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी आरती पै, शांतिलाल काळे, किरण देशमुख, राजेंद्र (सुधा) पाटील, इम्तियाज हकीम आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे मार्गदर्शन करताना म्हणाले, सामाजिक गैरसमजांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाच्या दिशेने ठामपणे पाऊल टाका. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला सामोरे जा, या मार्गदर्शनामुळे उपस्थित उमेदवारांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित झाली.

मेळाव्यात उपस्थित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीच्या क्षेत्रानुसार वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, ऑनलाईन नोंदणी, कर्ज प्रस्ताव सादरीकरण व उद्योजकतेसाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आत्मविश्वास जागवणे आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे, हेच या मेळाव्याचे खरे वैशिष्ट्य ठरले.

या उपक्रमातून तृतीयपंथीय उमेदवारांना त्यांच्या क्षमतांनुसार योग्य दिशा मिळावी, तसेच समाजात सन्मानाचे स्थान निर्माण व्हावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. “सांगली पॅटर्न” म्हणजे केवळ आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना नाही; तर सामाजिक समावेशकतेचे जिवंत उदाहरण आहे, याची जाणीव या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिकांसाठी मालमत्ता करात सवलत’ हा समाज माध्यमांवरून प्रसारित होणारा संदेश फसवणूकीचा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फसवणूक टाळण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित;शेतमाल तारण योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 72 हजार घरकुल पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे