vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांची अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहास सदिच्छा भेट..

माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांची अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहास सदिच्छा भेट..

राज्य प्रतिनिधी- खासदार डॉ. कल्याण काळे यांनी अन्नामृत फाउंडेशनच्या जालना स्थित केंद्रीय स्वयंपाकगृहास दिनांक 25/02/2025 मंगळवारी सदिच्छा भेट दिली. सदरील भेटी दरम्यान त्यांनी अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची संपूर्ण माहिती समजावून घेतली.शालेय विद्यार्थ्यांना पाठविलेल्या पोषण आहाराचा आस्वाद देखील माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांनी घेतला.

अन्नामृत फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना सामाजिक सहभागातून विशेष उपक्रमा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या टोफू पनीर माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांनी स्वहस्ते कापले व या सेवेत स्वतः चा सहभाग नोंदवला. केंद्रीय स्वयंपाक गृहामध्ये असलेल्या स्वच्छतेबद्दल खासदार महोदयांनी उत्तम अभिप्राय दिला.

या भेटीदरम्यान महिको चे सदस्य श्री. मिश्राजी, कालिका स्टीलचे श्री. अरुणजी अग्रवाल, विनोदराय इंजिनीयर्स चे श्री. सुनिलभाई रायठठ्ठा, ओम हॉस्पिटलचे संचालक श्री. अग्रवालजी, श्री. बगडियाजी, १०० रु. सोशल क्लबचे श्री. उदयजी शिंदे, अन्नामृत फाउंडेशनचे श्री. सुदर्शन पोटभरे, श्री. गणेश नखाते, जि.प.चे माजी सभापती जयप्रकाश चव्हाण, राम सिरसाठ,उदय शिंदे, रवि बोचरे,अरुण पैठणे,गणेश गवळी, सोपान तिरुखे व इतर सदस्यांची उपस्थिती होती.000000–

संबंधित पोस्ट

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड येथे सौर व हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन

मेघालयातील लैतल्यंगकोट गावाजवळ शिलाँग–डावकी मार्गावर मोठी भूस्खलनाची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट – महापौर श्रीमती रितू तावडे

vishwatmaklokswamivarta

गणपती बाप्पा मोरया’ मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी!

vishwatmaklokswamivarta