vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या दिवाळी वस्तू व फराळ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद….

नमुंमपा ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या दिवाळी वस्तू व फराळ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद….

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण व सुविधा केंद्रामार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरणावर भर देण्यात येत असतो. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींचे पालक यांनी दिवाळी सणानिमित्त बनविलेल्या विविध उपयोगी वस्तू व साहित्य तसेच दिवाळी फराळ यांच्या प्रदर्शनाचा अभिनव उपक्रम नमुंमपा मुख्यालयात आयोजित करण्यात येतो.

          महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्रामार्फत यावर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात तळमजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांनी व त्यांच्या पालकांनी निर्मिलेल्या विविध वस्तूंच्या व दिवाळी फराळाच्या प्रदर्शन आणि विक्रीच्या स्टॉलला मोठया संख्येने महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच मुख्यालयात येणा-या अभ्यागत नागरिकांनी भेट देत त्यांना प्रोत्साहित केले.

          अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग उपआयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील यांच्यासह या प्रदर्शनाला भेट देत दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती व त्यांचे पालक यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे दिवाळी सणाला पूरक वस्तू व फराळ यांची खरेदीही अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी मोठया प्रमाणात करुन त्यांना प्रोत्साहित केले.

          दिव्यांग विद्यार्थी व पालक यांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन मिळावे तसेच त्यामधून त्यांना प्रोत्साहन मिळून हातभारही लागावा याकरीता हा अभिनव उपक्रम प्रत्येक वर्षी ईटीसी केंद्रामार्फत राबविला जात असून त्याला मिळणारा उत्तम प्रतिसाद दिव्यांगाना आनंद देणारा व केलेल्या कामाचे समाधान देणारा असल्याचे मत ईटीसी केंद्र संचालक सहा.आयुक्त श्रीम. अनुराधा बाबर यांनी व्यक्त केले.

000000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

जिल्ह्याची पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय झेप; ओडीपी प्लस कडे दमदार वाटचाल

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच किरकोळ कामे (फिनिशिंग टच) असल्यास ती पूर्ण करावीत आणि हिरवळ विकसित करावी..मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रत्यक्ष भेटीप्रसंगी निर्देश..

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत नागरिकांना घरपोच शासकीय सेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे८० विभागांच्या तब्बल ४०२ सेवा आता नागरिकांच्या दारी

vishwatmaklokswamivarta