vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्य क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात-विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे आवाहन

राज्य क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात-विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे आवाहन

 

 

ठाणे, प्रतिनिधी ऑलिम्पिकमधील पहिले पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिन 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयावरील व्याख्यान तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा विषयक चर्चासत्रे, नविन खेळांविपयक चर्चासत्रे, क्रीडा प्रदर्शन, क्रीडा विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दि.१२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात यावे. तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच दि.२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन १९५२ मध्ये हेलसिंकी, फिनलँड येथील ऑलिंपिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक (कांस्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी व त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात यावा, असे निश्चित करण्यात आले आहे.

त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व स्वंयअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये शासकीय तसेच शासनमान्य खाजगी विद्यापीठे, एकविध क्रीडा संस्था/असोसिएशन, क्रीडा मंडळे, क्रीडा अकादमी, शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ/अनुदान मिळालेल्या सर्व संस्था, अन्य संस्था/ मंडळे यांनी राज्य क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे. तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा विषयक चर्चासत्रे, नविन खेळांविपयक चर्चासत्रे, क्रीडा प्रदर्शन, क्रीडा विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात यावे. तसेच महाराष्ट्राचे, भारत देशाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी रूही शिंगाडे यांनी केले आहे.0000000000

संबंधित पोस्ट

पोलीस हवालदार समद खान पठाण सेवानिवृत्त-समाजसेवक मुसा खान यांनी सेवानिवृत्त बद्दल पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कारवाई! अन्न परवाने निलंबित, अनेक नियमांचं सर्रास उल्लंघन

भारतीय तटरक्षक दलाने जीएसएलच्या नवीन पिढीच्या ‘अमूल्य’ फास्ट पेट्रोल व्हेसलला सेवेत दाखल

vishwatmaklokswamivarta

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पहिल्यांदाच होणार #डिजिटलजनगणना ; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण #कार्यशाळा संपन्न

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत