vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ २६ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी पात्र आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष रुपये ४३ हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रूपये ३८ हजार या प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १०५ विद्यार्थ्यांची लाभाकरीता निवड केली जाणार आहे.

 बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणाऱ्या प्रथम, वर्षातील विद्यार्थ्यांना दिनांक 2६ ऑक्टोबर पर्यंत https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावी.

000

संबंधित पोस्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या,माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत राज्याची सकारात्मक चर्चा

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन..

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना;एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई