vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे आवाहन*

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे आवाहन*

  सातारा, प्रतिनिधी – इतर मागास बहुजन कल्याण, विभागाकडून शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विदयार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना दरमहा भोजन, प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य, आरोग्य इ. करीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो. या योजनेचा लाभ घेणेकरीता बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असलेले विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिमाह भोजन भत्ता रुपये ४ हजार ५००, निर्वाह भत्ता प्रतिमाह सहाशे रुपये, मुलींकरीता स्वच्छता भत्ता प्रतिमाह दोनशे रुपये, नाईट ड्रेस, महाविदयालयीन गणवेश, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट याकरीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दिनांक २६ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

शेवगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

vishwatmaklokswamivarta

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ

vishwatmaklokswamivarta

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत