vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

आरसेटीच्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर

आरसेटीच्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर

 

अमरावती, प्रतिनिधी: ग्रामीण विकास मंत्रालय आणि बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे विविध व्यवसायावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा येत्या वर्षातील कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

संस्थेतर्फे प्रशिक्षण संपूर्ण मोफत असून निवास आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य केली जाते. सोबतच कर्ज प्रस्तावासाठी मार्गदर्शन करण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचे कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र देण्यात येते.

प्रशिक्षणाची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहणार असून वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे. प्रवेश मर्यादा ही 35 प्रशिक्षणार्थी राहणार आहे. यासाठी आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, 3 पासपोर्ट फोटो, ग्रामीण बीपीएल असल्याचा दाखला, नरेगा जॉब कार्ड झेरॉक्स ही आवश्यक कागदपत्रे आहे.

प्रवेशासाठी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, टिळक हॉलजवळ, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती, येथे संपर्क साधावा, तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी rb.gy/fiy5qx आणि दूरध्वनी क्रमांक – ९४०४६२८३८०, समन्वयक दीपक माहुरे, ९९२२२५८५११, अनिता तरारे ९०९६७८५२४० यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे समाजसेवक मुसा खान व मुन्नाभाई यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतजालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू