vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

व्यवसाय सुरु करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

व्यवसाय सुरु करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

सातारा प्रतिनिधी व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षणासाठी अनुसूचित जातीमधील महार, नवबौध्द, हिंदू खाटीक, वाल्मीकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम या प्रवर्गामधील गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन सातारा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. एम. पवार यांनी केले आहे.

   अनुदान योजना ही 50 हजार पर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये अनुदान म्हणून व 25 हजार पर्यंत बँक कर्ज लाभार्थ्याला दिले जाते. बीज भांडवल योजनेमध्ये 50 हजार 1 रुपयापासून ते 5 लाखांपर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के लाभार्थीचा सहभाग, 5 टक्के महामंडळाचे बीजभांडवल, 20 टक्के अनुदान 50 हजार रुपयेचा समावेश आहे. थेट कर्ज योजना ही 1 लाख रुपयांची असून महामंडळाची बीज भांडवल रक्कम 75 हजार असून 20 हजारपर्यंत अनुदान दिले जाते. यात लाभार्थ्यांच्या हिस्‌सा 5 टक्के असावा लागतो.

     या सर्व योजनांसाठी अर्जदारांनी https://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईट वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टारंट उड्डाणपुलाजवळ सातारा, दुरध्वनी क्र. 2162-298126 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाकडून करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ परिसराचे भूमिपूजन -ट्रांजिस्ट कॅम्पसचे सुध्दा ई- अनावरण…

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta