vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५-२६ मध्ये सांगली जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून अंमलात आणली जाणार आहे.

     या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष या अधिसूचित फळपिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, विशेषतः गारपीटीमुळे (Add-on Cover) नुकसान झाल्यास, विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती विमा कंपनी किंवा संबंधित मंडळ कृषि अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनीकडून जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी करून वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी Bajaj Allianz General Insurance Company Limited (टोलफ्री: १८०० २०९ ५९५९) यांच्याशी संपर्क साधावा

     गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वेळेत माहिती देऊन पंचनामे करून घ्यावेत, तसेच या योजनेचा लाभ घेऊन फळपिकांचे आर्थिक संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना- तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश..

महाविस्तार अपचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता…

vishwatmaklokswamivarta