सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणी,मतदार पडताळणीसाठी 25 ते 27 मार्चपर्यंत विशेष कॅम्प
सांगली, प्रतिनिधी :आगामी येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सन 2002 च्या मतदार यादीतील मतदारांचे दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मतदार यादीशी पडताळणी करण्याचे कामकाज सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर सुरू करण्यात आले आहे. या कामकाजाच्या दृष्टीने 282-सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये 25 ते 27 मार्च 2026 या कालावधीत मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याचे 282-सांगली विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी समाधान शेंडगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सेल्फ मॅपिंग व रक्तनातेसंबंधातील मतदान शोधणे द्वारे सन 2002 ची विशेष सखोल पुनरिक्षणची अंतिम मतदार यादी व सन 2024 ची विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी या दोन्ही यादींची तुलना करून ज्यांची नावे 2002 विशेष सखोल पुनरिक्षणच्या अंतिम मतदार यादीत उपलब्ध नाहीत, अशा मतदारांचे मॅपिंग त्यांचे आई वडील व आजी आजोबा यांची नावे शोधून प्रॉग्नी मॅपिंग (Progeny Mapping) करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने 282- सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
282-सांगली सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बीएलओ यांनी मागितलेली माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यपध्दतीमध्ये मतदारांचे सेल्फ मॅपिंग व प्रॉग्नी मॅपिंग पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदारांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या वास्तव्याची माहिती घेऊन निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर भेट देऊन मतदारांची सन 2002 विशेष सखोल पुनरिक्षणची माहिती उपलब्ध करून मॅपिंग करण्याचे आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांशी समन्वय साधला असून सर्व राजकीय पक्षांनी सुध्दा याबाबत मतदार केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांची नियुक्ती करून या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे