vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

 

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमध्ये बेसमेंटच्या खोदकामामुळे मोठया प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होते. याबाबत अलिकडेच मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी स्वत:हून दाखल करुन घेतलेल्या (Suo-moto) PIL No. 3/2023 मध्ये दि. 11 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

त्यानुसार मा. उच्च न्यायालयाकडील दि.11 डिसेंबर 2023 रोजीचे आदेश तसेच वायू व ध्वनी प्रदूषण आणि ब्लास्टींगच्या अनुषंगाने नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होत असलेल्या तक्रारी विचारात घेता त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने “मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure – SOP)” तयार करुन दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या कार्यप्रणालीची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अंर्तभूत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून ती यशस्वी झालेली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने सन 2020 मध्ये मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीतील जुन्या मोडकळीस आलेल्या सिडकोकालीन इमारतीच्या पुनर्विकासाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिक तसेच विकासक यांच्यामध्ये इमारतीचा पुनर्विकास करणेबाबत असलेल्या तरतूदींची जनजागृती व्हावी म्हणून क्रेडाई तसेच बीएएनएम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025 (Property Expo 2025)’ मध्ये महानगरपालिकेमार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाच्या वतीने माहिती व जनजागृतीपर स्टॉल लावण्यात आलेला आहे.

 या माध्यमातून 2020 मध्ये मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीप्रमाणे इमारतीचा पुनर्विकास करणे तसेच काम सुरु असताना प्रत्यक्ष जागेवर होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगबाबत विकासकांमार्फत योग्य त्या उपाययोजना करुन परिसरातील नागरिकांना होत असलेला त्रास व त्यास अनुसरुन लोकप्रतिनिधी व नागरिक यांचेकडून प्राप्त होणा-या तक्रारींचे निवारण करणे शक्य होत आहे. त्याचप्रमाणे ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पामध्ये अवलंबवयाच्या ‘मानक कार्यप्रणाली (SOP)’ बाबत जनजागृती करण्यासाठी या स्टॉलच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे  त्यासोबतच मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदींबाबत आवश्यक कागदपत्रे व इतर आवश्यक बाबींची माहितीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत दिली जाणार आहे, जेणेकरुन पुर्नविकासाची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करणेची कार्यवाही विकासकास व गृहनिर्माण संस्थेस सहजशक्य होणार आहे.

  या प्रदर्शनाच्या शुभारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी या स्टॉलला स्नेहभेट देत पाहणी केली व महानगरपालिकेने नागरिकांना योग्य माहिती देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली.

  तरी विकासक, सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद / पदाधिकारी यांना असे आवाहन करण्यात येते की, या प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापन केलेल्या विशेष स्टॉल्सना भेट देऊन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

संबंधित पोस्ट

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-स्वयंसहाय्यता बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ;बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय !*_*देवस्थानांच्या हडप केलेल्या जमिनींच्या सर्वेक्षणाचे; तसेच ‘ॲन्टी लँड ग्रबींग ॲक्ट’चा मसुदा तयार करण्याचे आदेश !*

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर