vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम-प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम-प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

 

बुलडाणा, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या बुधवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मे महिण्यासाठी वेळापत्रक जाहिर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाचे कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

बुलडाणा विभागातील चिखली आगार येथे बुधवार दि. 7 मे, खामगाव आगार येथे बुधवार दि. 14 मे, मेहकर आगार येथे बुधवार दि. 21 मे, मलकापुर येथे बुधवार दि. 28 मे, जळगाव जामोद येथे दि. 4 जुन व शेगांव आगार येथे बुधवार दि. 11 जुन रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

0000000

संबंधित पोस्ट

हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ – उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे अधिक गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• *रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती *मुंबई ३.० साठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा एकात्मिक मास्टर प्लॅन……

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांसाठीच्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- पालक सचिव गोविंदराज

भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल- मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.रामगुलम

vishwatmaklokswamivarta