vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला.या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली.

पाकिस्तान बरोबर आता आरपार ची लढाई केली पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवाद समूळ नष्ट केला पाहिजे. पाक ला एकदा युद्धाचा एकदा जोरदार शॉक दिलाच पाहिजे असे ना.रामदास आठवले यांनी आज सांगितले.

बांद्रा पूर्व येथील आतंकवाद विरोधी निषेध रॅलीचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश तर्फे करण्यात आले अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिले.रिपब्लिकन पक्षाच्या आतंकवाद विरोधी रॅली चे नेतृत्व रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; मुंबई सरचिटणीस विवेक पवार जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड; संजय पवार; अजित रणदिवे; प्रकाश जाधव; संजय डोळसे रवी गायकवाड यांनी केले.महिला आघाडी च्या ॲड आशाताई लांडगे; अभया सोनवणे उषाताई रामलू तसेच रिपाइं चे श्रीकांत भालेराव;सोहेल शेख; योगेश शिलवंत विजय वंजारी भारती गुरव; रत्ना शिंदे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम व सफाईमित्रांचा कृतज्ञ सन्मान…

vishwatmaklokswamivarta

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने आसामला 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा इथला भूखंड देण्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

निराधार वृद्ध आजी ला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचा मिळाला आधार

नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत

vishwatmaklokswamivarta

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta