vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

 

     अमरावती, प्रतिनिधी) : सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी अमरावती येथील भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्रातर्फे दि. 1 जानेवारी ते 31 जुन 2026 या मुदतीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. 1 ते 30 जानेवारी 2026 या दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे.     सहकार विभागाने सहकारी संस्थांमध्ये काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पद्धतीने पुर्ण करता यावा, तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पद्धतीने सुरू केला आहे.

     प्रवेशासाठी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्राचे भाऊसाहेब भोकरे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

vishwatmaklokswamivarta

नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न 

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली ८०० कोटींच्या मालमात्ताकर वसुलीचे उद्दिष्ट गाठणारी गुढी ….

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta

बचत गटांना अर्थसहाय्य देऊन विकास कार्यक्रमांना गती द्या : जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग

vishwatmaklokswamivarta