vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील* एचपीव्ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू   * 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस

महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील* एचपीव्ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू   * 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस

बुलढाणा, प्रतिनिधी: महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस(HPV) लसीकरण मोहीम लवकरच बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाणार असून हे महिलांच्या आरोग्याच्या दिशेने महत्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

            एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत नियोजन, समन्वय आणि जनजागृतीसाठीची महत्वाची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) राज्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब सय्यद, तसेच आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, अल्पसंख्याक व आयसीडीएस विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत (Cervical Cancer) चिंता व्यक्त करण्यात आली. बदलत्या जीवनशैली, असंतुलित आहार, तणाव आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हा कर्करोग महिलांमध्ये झपाट्याने वाढत असून, सध्या देशातील महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा असा व्हायरस आहे जो महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. हा संसर्ग लैंगिक संपर्काद्वारे होऊ शकतो. HPV लसीकरण केल्यास शरीरात या विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका तब्बल ९९ टक्क्यांनी कमी होतो.

खासगी रुग्णालयांमध्ये 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत किंमत असलेली ही लस आता शासनाच्या पुढाकारामुळे 14 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलींना मोफत देण्यात येणार आहे. यासाठी शाळांमार्फत सर्वेक्षण सुरू असून, प्रत्येक शाळेतील मुलींची माहिती संकलित केली जात आहे. या मोहिमेचा लाभ फक्त शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातील नागरिकांनाही मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाने डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहीम औपचारिकपणे सुरू होईल, अशी माहिती जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी दिली.

एचपीव्ही लसीकरण ही फक्त लस नसून, महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य संरक्षणाचे प्रभावी शस्त्र आहे. वेळेवर लसीकरण झाल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू व शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतील. अनेक वेळा या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला घेणे आणि HPV लसीकरणाबाबत जागरूकता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने घेतलेला हा उपक्रम ‘आरोग्यदायी माता – सशक्त समाज’ या ध्येयाकडे नेणारे एक मोठे पाऊल असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.: गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची प्रमुख कारणे: असुरक्षित लैंगिक संबंध, हार्मोनल असंतुलन व औषधांचा दुरुपयोग, तणाव, प्रदूषण आणि चुकीचा आहार, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचा संसर्ग.

000000

संबंधित पोस्ट

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून शुभारंभहत्तीरोगग्रस्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये रुग्ण तपासणी…

राज्यातील सार्वजनिक #आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (#एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

vishwatmaklokswamivarta

आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनास दिलेले प्रशिक्षण उपयुक्त – जिल्हाधिकारी अशोक काकडे – मेहता हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

जिल्हा व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबीर

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी