vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोफत वीज सवलत व गणेश उत्सव भत्ता योजना लाभासाठी अर्ज मागविले

मोफत वीज सवलत व गणेश उत्सव भत्ता योजना लाभासाठी अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)-एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ जाहीर झालेले आहे. त्यानुसार राज्यातील हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज सवलत देण्याची व गणेश चतुर्थी निमित्त पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना गणेश उत्सव भत्ता योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेचा लाभ घेणेकरीता नोंदणीकृत विणकरांकडून अर्ज मागविले आहेत.सदर अर्ज प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफर गेट, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत विहित नमुन्यातील अर्ज दिनांक २५ जून.२०२६ पर्यंत मागविण्यात येत आहेत.

 नोंदणीकृत विणकरांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक २५ जूनपर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग संभाजीनगर कार्यालयाकडे कागदपत्रासह सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात उपलब्ध आहे, असे उपआयुक्त, वस्त्रोद्योग, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू- शालेय शिक्षण विभागाची माहिती –

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात 11 डॉग शेल्टरसाठी पावणेपाच कोटींची भरीव तरतूद,- महापालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना

जालना रेल्वे स्थानकावर अनधिकृत सजावट प्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 : कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण, क्वांटम आणि ड्रोन तंत्रज्ञानावर भर असलेली राष्ट्रीय सायबर स्पर्धा

जिल्हा कृषी महोत्सवाचे कराड येथे 26 ते 30 डिसेंबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा