vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा(१४ जून) रोजी आयोजन;६४ उपकेंद्रांवर २० हजार ६६६ उमेदवार देणार परीक्षा

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा(१४ जून) रोजी आयोजन;६४ उपकेंद्रांवर २० हजार ६६६ उमेदवार देणार परीक्षा

 राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर आयोग-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ही दि.१४ जून, रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत घेण्यात येणार आहे

या परीक्षेसाठी प्रशासनाने तयारी केली असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण ६४ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांवर एकूण २०,६६६ उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आले आहेत. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण २हजार १४३ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आयोगाचे विशेष अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवाराला उपलब्ध करून दिलेल्या प्रवेश पत्रातील नमूद परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहण्याची आणि परीक्षा संबंधित सर्व सूचनाचे पालन करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय.

vishwatmaklokswamivarta

कृष‍ि विभागाची धडक कारवाई-अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

रायगड जिल्ह्यातील महिलांची गणेशमूर्ती विक्रीत गरुडझेप

vishwatmaklokswamivarta

अंबडमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणात आयोग आक्रमक; जिल्हा प्रशासनाला तातडीचा इशारा,अटक न झाल्याने संताप; पीडित कुटुंबाच्या आंदोलनाची दखल, आजच अहवाल सादर करण्याचे आदेश

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अफीडेव्हीट / नोटरीची अट रद्द करा.काँग्रेस माथाडी कामगारचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी घाटी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले