vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा अर्जास मुदतवाढ

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा अर्जास मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा दि.२८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार, नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि.२१ ऑक्टोबर असून, विलंब शुल्कासह दि.२२ ते ३० ऑक्टोबर पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. मात्र अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दि.३० ऑक्टोबर नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या आयुक्त श्रीमती अनुराधा ओक यांनी दिली आहे.शिष्यवृत्ती अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in आणि https://mscenmms.in या संकेतस्थळांवर भरता येतील.

०००००

संबंधित पोस्ट

सण-उत्सव एकोप्याने साजरे करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिवरायांच्या गडकोटांचा जागतिक सन्मान!”भाजपा महानगर जिल्ह्याच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यात्रा ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये *-अन्न व औषध प्रशासन विभाग*

vishwatmaklokswamivarta