vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवरायांच्या गडकोटांचा जागतिक सन्मान!”भाजपा महानगर जिल्ह्याच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा

 “शिवरायांच्या गडकोटांचा जागतिक सन्मान!”भाजपा महानगर जिल्ह्याच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा

राज्य प्रतिनिधी ‘आज जालना येथील भाजपा महानगर जिल्हा कार्यालयात एक ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षणाचा आनंद साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा गौरव गाथा सांगणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याची साक्ष देणारे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले आहेत.

या यादीत राजगड (स्वराज्याची पहिली राजधानी), रायगड (दुसरी राजधानी), शिवनेरी (शिवजन्मभूमी), प्रतापगड, लोहगड, खांदेरी, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आज जालना येथे भाजपा महानगर जिल्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे भरून जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी हा क्षण देशाच्या वैभवशाली इतिहासाच्या सन्मानाचा असल्याचे सांगितले

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले व म्हटले की, “शिवछत्रपतींच्या गडकोटांचा जागतिक स्तरावर झालेला सन्मान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे. हे निर्णय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष महेश निकम, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, सरचिटणीस सुनील पवार, ओबीसी जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर सखुबाई पणबिसरे, ममता कोंड्याल, राधा देविदास देशमुख, राजेश जोशी, सिद्धेश्वर हाजबे, वसंत शिंदे, डोंगरसिंग साबळे, सय्यद इम्रान, दत्ता जाधव, सतीश केरकळ, विजय जाधव, बद्रीनाथ वाघ, नागेश अंभोरे, दौलत भुतेकर, शाम जाधव, शाम उगले आदींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

कारागृहातील कैद्यांनी चांगले व्यक्तिमत्त्व बनून जीवन जगावे  – कारागृह अधीक्षक विजय कांबळे,सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी “जीवनगाणे गातच जावे”

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसाच्या नियोजनाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात

पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीबाबत शासन सकारात्मक- उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta