vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊनतरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा- मंत्री अतुल सावे

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊनतरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा- मंत्री अतुल सावे

मुंबई, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन, वित्तीय मदत आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. राज्यातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महामंडळ अंतर्गत सर्व उपकंपनी यांच्या संचालक मंडळाची बैठक झाली.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, महामंडळाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सर्व उपकंपनी यांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्धतेबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच महामंडळाच्या योजनांबाबत दिनदर्शिका तयार करण्यात यावी. महामंडळाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेतच असावे.

या बैठकीत यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात आली. महामंडळाच्या संचालक मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्यात आली.

०००0000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप

दक्षता व नियंत्रण समितीकडील अत्याचारविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा   -जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक संसाधनांवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचाच : पालकमंत्री संजय राठोड

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्पहार अर्पण

गुणवत्तापूर्ण कामातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta