vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे

नांदेड, प्रतिनिधी:- आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीव्‍दारे केली जाणार असून, अर्जदारांनी ऑनलाईन दाखल केलेल्‍या कागपत्रांचे आधारे शासन निर्णयानुसार पुढीलप्रमाणे गुणांकन करण्‍यात येईल. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास ३० गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास २५ गुण, सीएससी केंद्र असल्यास २५ गुण याप्रमाणे गुणांकन राहील.

मुलाखत प्रक्रिया :एका गावासाठी एकापेक्षा जास्त अर्जदार असतील आणि त्यांचे गुण समान असतील तरच मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी २० गुण निश्चित आहेत. मुलाखतीच्‍या गुणांची विभागणी खालील प्रमाणे करण्‍यात येईल. तांत्रीक ज्ञान असल्‍यास 06 गुण, लोकसेवा हक्‍क अधिनियम 2025 चे ज्ञान असल्‍यास 04 गुण, सामान्‍य ज्ञान व व्‍यक्तिमत्‍व, सामाजिक क्षेत्रात राबविलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्‍या कार्याचा अनुभव असल्‍यास- 10 गुण

मुलाखत समिती,या समितीचे जिल्‍हाधिकारी हे अध्‍यक्ष तर पोलीस अधिक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्‍त नांदेड वाघाळा महानगर पालीका, अधिक्षक राज्‍य उत्‍पादन शुक्‍ल, अधिक्षक भुमी अभिलेख प्राचार्य श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रीकी महाविद्यालय, प्राचार्य शासकिय तंत्र निकेतन, महाप्रबंधक भारत संचार निगम लिमिटेड नांदेड, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जि.प.नांदेड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शिक्षणाधिकारी(माध्‍यमिक) जि.प., शिक्षणाधिकारी (प्राथमीक) जि.प., जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी जि.प., जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी जि.का. हे सर्व सदस्य आहेत. तर सेतू समितीचे सदस्य सचिव हे निवासी उपजिल्‍हाधिकारी आहेत.

या समितीद्वारे मुलाखत घेण्‍यात येईल. अर्जदारांनी आपले सरकार सेवा केंद्र प्रक्रियेबाबत वेळोवेळी नांदेड जिल्‍हयाच्‍या संकेतस्थळावर https://nanded.gov.in भेट दयावी. कार्यालयास संपर्क साधु नये, यांची नोंद सर्व अर्जदारांनी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण..

मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती!

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

राजधानीत सरदार वल्लभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• परीक्षेच्या पूर्वतयारी, सज्जतेचा आढावा• प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त; वैद्यकीय पथके तैनात• सीसीटीव्ही कार्यान्वित; ड्युटी मॅजिस्ट्रेट व स्टेट ऑब्झर्वर यांची नियुक्ती

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन