vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भराडखेड्यात भव्य भराडखेडा प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्यासह हस्ते नाणेफेक करुन स्पर्धेला सुरुवात

भराडखेड्यात भव्य भराडखेडा प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्यासह हस्ते नाणेफेक करुन स्पर्धेला सुरुवात

जालना, (प्रतिनिधी)-बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘भराडखेडा प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेने संपूर्णपरिसरात क्रीडामय वातावरण निर्माण केले. या स्पर्धेला गावकर्‍यांचा तसेचयुवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे औचित्य साधत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्याहस्ते नाणेफेक (टॉस) करण्यात आली. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेलाविशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.यावेळी उद्योजक सुमन अ‍ॅग्रोचे एमडी. रमेश घुगे, भराडखेडाचे सरपंच भगवानबारगजे, प्रमोद बारगजे, गणेश दराडे, सुनील दराडे, बाबासाहेब दराडे,परमेश्वर शिंदे, कृष्णा मुलक,परमेश्वर खुर्मुते यांच्यासह गावातीलप्रतिष्ठीत नागरिक व आजु-बाजुच्या गावातील खेडाळूंची मोठ्या संख्येनेउपस्थिती होती. स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शनघडवले. अंतिम सामन्यात सुमन अ‍ॅग्रो संघाने दमदार आणि शिस्तबद्ध खेळ करतप्रतिस्पर्धी संघावर तब्बल ५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. संघाच्याखेळाडूंनी दाखवलेली एकजूट, जिद्द आणि क्रीडाभावना प्रेक्षकांच्या मनातठसा उमटवून गेली. सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’पुरस्कार सुमन अ‍ॅग्रो संघातील खेळाडूस रुपम घुगे यांच्या हस्ते प्रदान

करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रुपम घुगे यांनी प्रभावीविचार मांडले. त्या म्हणाल्या, ‘आजच्या तरुणांनी दारू, तंबाखू आणि इत नशेच्या व्यसनांपासून दूर राहून क्रीडाक्षेत्राकडे वळणे ही काळाची गरजआहे. खेळामुळे केवळ शरीर सुदृढ राहत नाही, तर मनही सकारात्मक राहते.क्रीडा संस्कृतीमुळे शिस्त, संयम आणि संघभावना विकसित होते.’ त्यांच्याप्रेरणादायी शब्दांनी उपस्थित युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.या स्पर्धेमुळे केवळ खेळाचेच नव्हे, तर सामाजिक एकोप्याचेही दर्शन घडले.युवकांना योग्य दिशा देण्याचे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचेकार्य या उपक्रमातून यशस्वीरित्या पार पडले. भराडखेडा प्रीमियर लीग हीस्पर्धा गावातील क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरली असून, भविष्यातहीअशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. ग्रामीणभागात क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत असल्याने खेळाडूंनी आनंद व्यक्त केलाआहे.

०००००००००००भराडखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘भराडखेडा प्रीमियर लीग’क्रिकेट स्पर्धेचे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगेयांच्या हस्ते नाणेफेक (टॉस) करण्यात आली.

 

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू..

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नांदेडच्या एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले19 अपिलार्थींचे 7 हजार 567 व्दितीय अपील फेटाळले

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

सर्वात भीषण दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये हिंदू नाव घेऊन पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…