vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संगमनेर तालुक्यातील टंचाई आढावा बैठक संपन्न;”मुख्यालयात राहून नागरिकांना विविध योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना विश्वास द्यावा- पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील”

संगमनेर तालुक्यातील टंचाई आढावा बैठक संपन्न;”मुख्यालयात राहून नागरिकांना विविध योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना विश्वास द्यावा- पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील”

राज्य प्रतिनिधी-टंचाई कालावधीत कृषी, पशुसंवर्धन, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या तालुकास्तरीय यंत्रणेने मुख्यालयात राहून प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे शेतकरी व नागरिकांना पिण्याचे पाणी पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस आमदार अमोल खताळ, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, संगमनेरचे उप विभागीय अधिकारी अरुण उंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधीर बोराळे, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे, पशुसंवर्धन आणि इतर विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पिक विमाबाबत कोणतीही टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा चालणार नाही. पिकांचे १००% पंचनामे पूर्ण करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी ग्रामविकास आणि महसूल विभागांनी घ्यावी

 मुख्यालयात उपस्थिती अनिवार्य,                 कृषी, पशुसंवर्धन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयात थांबून प्रत्यक्ष स्थळ भेटीद्वारे वस्तुस्थिती समजून घ्यावी. आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा. उपशोधनासाठी आवश्यक असणारा चारा डेपो त्याचप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असल्यास याबाबतचे सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा. संगमनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पशुधनासाठी राखीव चारा, तसेच जलसंपदांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.भोजापूर प्रकल्पाच्या रुंदीकरणाच्या भूसंपादनाबाबत सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल जलसंपदा विभागाने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

 महावितरणने वीज पुरवठ्यातील कालावधी कमी करावा. तसेच नादुरुस्त डीपी (DP) आणि ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याची कारवाई करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळेल. जल जीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या मालदांड, जोरवे, वरवंडी, पाचगाव, निमोण यांसह अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्याने पूर्ण करावे. सद्यस्थितीत संगमनेर तालुक्यातील आठ गावे आणि सोळा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, भविष्यातील टंचाईवर मात करण्यासाठी महिनानिहाय गावात लागणाऱ्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे

 संगमनेर शहरातून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या स्त्रोतामुळे पाणीपुरवठ्यात दूषित पाणी जात असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरपालिकेने व मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करावी. तसेच पाण्याचा पुनर्वापर (Recycling) करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.

आमदार अमोल खताळ यांनी यावेळी तालुक्यातील सर्व शेतीचे पंचनामे विनाविलंब पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच वीज पुरवठा, चारा उपलब्धता आणि पीक विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता महसूल व कृषी विभागाने घ्यावी, अशी भूमिका मांडली.

बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनीही टँकर, चाराबियाणे आणि नुकसान भरपाईबाबत आपल्या मागण्या मांडल्या, यावर प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. आहेत

संबंधित पोस्ट

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट,सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !वर्ष ७११ पासून सुरु असलेल्या जिहादच्या षडयंत्राविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी जनजागृती अभियान !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर शहीदी समागमसाठी२५० जणांची संगत नांदेड कडे रवाना…

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर विभागातील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली पाहणी 

vishwatmaklokswamivarta