vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड जिल्ह्यासाठी  25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड जिल्ह्यासाठी  25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड प्रतिनिधी :-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 24 व 25 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24 व 25 मार्च 2026 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा :विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

vishwatmaklokswamivarta

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न

CoffeewithCollector उपक्रमांतर्गत #जलतारा चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

जालना येथील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज करावेत

जलसंवर्धन ही काळाची गरज; युवकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल