vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अहिल्यानगर, प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील सुपा येथे पर्यटन विकास अंतर्गत शिवतीर्थ चौक सुशोभीकरण काम तसेच सुपा गावठाणांतर्गत तीन पाणंद रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शहरांचा विकास हा राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमात असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत.

४० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांसांगितले.

0000

संबंधित पोस्ट

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे,१६५२ वाड्यांमध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

धारावीत ज्येष्ठ नागरिकांसाठी छळवाद प्रतिबंध माहिती सत्र संपन्न*

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

डिजिटल व्यवहारांसाठी डाक विभागाची विशेष मोहीम:· प्रीमियम, पॉलिसी, दाव्यांची माहिती तत्काळ मिळणार· ग्राहकांनी केवायसी दस्तऐवजांसह माहिती सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा बिगुल-हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल**विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा*रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर*