vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

अहिल्यानगर, प्रतिनिधी- पारनेर येथील राज्य परिवहन महामंडळ आगार इमारत तसेच नवीन न्यायालय इमारतीच्या बांधकामांची राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता व वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 यावेळी आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगार बांधकामाची पाहणी करून प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात एस.टी. सेवेवर अवलंबून असल्याने आगार परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी स्वतंत्र विशेष कक्ष तसेच हिरकणी कक्ष उभारण्यात यावेत. प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. ऊर्जा बचतीच्या दृष्टीने आगारासाठी सौर ऊर्जेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जेचा वापर महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी पारनेर व सुपा आगार बीओटी प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवासी सुविधा, बस स्थानक परिसर विकास, वाहतूक नियोजन तसेच भविष्यातील गरजांनुसार सुविधा उभारण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली.

त्यानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी पारनेर येथे सुरू असलेल्या नवीन न्यायालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बांधकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम

राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात;दिव्याशा केंद्र दिव्यांगासाठी पर्वणी – ना. प्रतापराव जाधव• केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण• 47 दिव्यांगांना 3 लाख 51 हजारांचे साहित्य वाटप

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta