vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*प्रधानमंत्री मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही*

*अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*प्रधानमंत्री मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही*

जम्मू प्रतिनिधी ~ अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल.मात्र आतंकवाद संपवण्याची पाकिस्तानची ईच्छा नाही.पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे.अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आय पी एस किरण बेदी यांच्यासह अनेक मान्यवरांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजक आणि रिपाइं जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्षा संध्या गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री असताना आगरा येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी अटलजींची चर्चा झाली होती.तेंव्हा पाकिस्तान ने आतंकवादी करावया थांबवाव्यात. आतंकवाद जोपर्यंत रोखला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण सबंध स्थापन होऊ शकत नाहीत असे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ या लष्करशहाने आतंकवाद संपविण्यास स्पष्ट नकार दिला होता.त्यामुळे आतंकवाद संपवण्याची आणि भारताशी मैत्री करण्याची पाकिस्तानचीच इच्छा नाही. त्यामुळे अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

भारत नाही कुणाचा गुलाम म्हणून आम्ही करीत आहोत देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम असे सांगत ना.रामदास आठवले यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड ने सन्मान केला.त्यात बी एस एफ; सी आर पी एफ च्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा समावेश होता.यावेळी 26/ 11 मुंबई हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचविणारे पोलिस सबइन्स्पेक्टर मंगेश नाईक यांचा यावेळी महाराज हरिसिंह डोगरा अवॉर्ड ने न. रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी या आपल्या शिस्तप्रिय कर्तृत्वासाठी लोकप्रिय होत्या.त्यांच्या कार्यकाळात दिल्लीत त्या आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी तत्कालीन प्रधानमंत्र्यांची गाडी जेसीबी ने उचलून नेऊन कारवाई केली होती. याची आठवण सांगताना ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही.विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने मोदींची विकासाची गाडी पुढे चालली आहे.अशी टिप्पणी ना.रामदास आठवले यांनी केली.

शिस्तप्रिय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून किरण बेदी अधिक लोकप्रिय आहेत. किरण बेदी यांचा महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड ने ना.रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटविल्यामुळे येथील पोलिस बीएसएफ यांना अधिकारी मिळाले आहेत.त्यामुळे पूर्वीपेक्षा तुलनेने जम्मू काश्मीर मध्ये चांगली शांतता वाढत आहे.आतंकवाद कमी होत आहे.जम्मू काश्मीर मधून संपूर्ण आतंकवाद नष्ट करायचा आहे.असे ना. रामदास आठवले म्हणाले.   हेमंत रणपिसे     प्रसिद्धी प्रमुख

संबंधित पोस्ट

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

vishwatmaklokswamivarta

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta

आरटीई” प्रवेशासाठी पालकांनीकोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई-शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..

जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन· मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती..