vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

 

छत्रपतीसंभाजीनगर, प्रतिनिधी-कोणतेही आरोग्य अभियानात गावातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असतो. त्याशिवाय त्या अभियानाला यश येत नाही. चांगल्या आरोग्याचे नागरिक ही विकासाची पूर्व अट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आरोग्य अभियान राबवून त्याचे १०० टक्के निर्मूलन होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकार दिलीप स्वामी यांनी आज केले.

 राष्ट्रीय क्षयरोग दुरी करण कार्यक्रमांतर्गत आज टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या अभियानात ३२८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ३०४ ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्या, तर सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी रजत सन्मान’ प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.वैशाली डिकले तसेच सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आरोग्याचा विषय हा स्वच्छतेशी निगडीत आहे. कोणत्याही आजारांविषयीचे अभियान गावात आरोग्य विभागामार्फत राबविले जाते त्या अभियानात गावकऱ्यांनी सहभागी होऊन अशा आजारांचे १०० टक्के निर्मूलन करण्यात योगदान दिले पाहिजे. केवळ पुरस्कार मिळणार म्हणून अभियानात भाग घेऊ नका. तर अशा अभियानाचे जे सर्वंकष फायदे असतात त्याचाही विचार करा. टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी काम करतांनाच ग्रामस्थांनी बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, बालकामगार, कुपोषण अशा प्रश्नांवरही एकत्र येऊन लढा दिला पाहिजे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितले की, ज्या समाजाचे आरोग्य चांगले तो समाज सर्वच क्षेत्रात प्रगती करतो. त्यामुळे आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या अभियानांमध्येसर्व गावकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे. तसेच अशा अभियानांमध्ये गावातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. आपले गाव टीबी मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी केले.

 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजीत या सोहळ्यात क्षयरोग निवारण मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३२८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ३०४ ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्या, तर सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी रजत सन्मान’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण ८६८ ग्रामपंचायतींमध्ये ५९,१३८ संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यामधून ५४४ ग्रामपंचायतींमध्ये १,५०६ क्षयरुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. वैशाली डिकले यांनी प्रास्ताविकात दिली.यावेळी ग्रामपंचायती, उत्कृष्ट कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांनाही सन्मानीत करण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

गर्दीचे रूपांतर मतपेटीत होत नाही – कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १६१२ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी(दि.२५);विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे – कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह कुंभमेळा प्राधिकरणातर्फे साधू महंत यांच्याशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीचा आढावा नागरिकांना लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान सेवा द्यावी-डॉ. किरण जाधव