vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना, प्रतिनिधी) : सन 2026-2027 या वर्षामध्ये संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत चारा बियाणे वाटप करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांकडे सिंचनाची सोय आहे, व ज्यांच्याकडे पशुधन आहेत अशा लाभधारकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. संभाव्य एल-निनो या हवामान घटकांचा प्रतिकुल परीणाम होण्याची शक्यता असलयाने चारा टंचाई टाळण्यासाठी चारा बियाणांसाठी इच्छूकांनी अर्ज करावेत. तसेच संभाव्य चारा टंचाई निर्माण होवु नये, व चारा छावण्याची वेळ पडू नये याकरीता आतापासुनच चारा निर्मीती व त्याच्या साठवणुकीबाबतचे अचुक नियोजन करणे आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्याकडे भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या प्रणालीवर नोंद असलेली स्वत: ची किमान 3 ते 4 जनावरे आहेत, अशा लाभधारकांना प्राधान्य देण्यात येईल. एका आर्थीक वर्षात एका लाभधारकांस एकदाच लाभ अनुज्ञेय राहणार आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 05 मे, 2026 पर्यत आपले अर्ज संबधीत आपल्या गावातील पशुवैद्यकिय संस्थेकडे सादर करावीत, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिप, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना,महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

मुंबईतील साकीनाका येथे रस्त्यावरील उघड्या मेन हॉलमध्ये पडून एका स्थानिकाचा मृत्यू झाले असल्याची वृत्त

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार-(MahaVISTAAR-AI’) मोबाईल अपचा वापर करावे

vishwatmaklokswamivarta

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य