vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई

 

बॉलीवूड प्रतिनिधी –

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. सोमवारी चित्रपटाने 24.10 कोटींची कमाई केली.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित ‘छावा’  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. विकी कौशल  आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. छाावा बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 33.10 कोटी, दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी, तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 24.10 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे, ‘छावा’ने 4 दिवसात एकूण 145.53 कोटी रुपये कमावले आहेत.

या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे आणि चित्रपट यशस्वी करण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांसारख्या कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाला आणखी उत्कृष्ट बनवले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आज देशात अनेक राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी करण्यात येत आहे याच धर्तीवर प्रेक्षकी मोठ्या प्रमाणात यावेळी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ” छावा” हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी सुरूच आहे सर्वच सिनेमागृहात आजच्या दिवशीही सर्वत्र हाउसफुल झालेल्या दिसून येत आहे अनेक चित्रपट समीक्षकांच्या मते” छावा” अनेक मोठ्या चित्रपटाचे अधिपत्य मोडून काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे

संबंधित पोस्ट

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे असे असे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार अजित पवार आपल्या x सोशल मीडिया अकाउंट वर म्हटले आहे

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :

सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*