vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी.

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 जालना, प्रतिनिधी) :- जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, शारदीय नवरात्रौत्सव, आंदोलने या सण, उत्सव आणि इतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि. 12 सप्टेंबर 2025 ते 25 सप्टेंबर पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 25 सप्टेंबर रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार…

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तरे शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;अहवालांतील विलंबही कमी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके

vishwatmaklokswamivarta

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025**किशोरवयीन मुलींचे जीव वाचवणाऱ्या गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण**मिशन तेजस्विनी” अंतर्गत जीविका फाउंडेशन आणि सातारा जिल्हा परिषद यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य*

vishwatmaklokswamivarta