vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश

महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश

बुलढाणा: प्रतिनिधी: जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती ३१ मार्च २०२६ रोजी साजरी होणार असून, या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार, मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात सर्व कत्तलखाने, मांसविक्रीची दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महावीर जयंती उत्सवाच्या काळात समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि धार्मिक सलोखा टिकून राहावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील मुख्याधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये या दिवशी मांसविक्री होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.0000

संबंधित पोस्ट

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी..

सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त : जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार-गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम