vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

मुंबई, प्रतिनिधी : “असेसमेंट इनोव्हेशन : मल्टिपल चॉईसच्या पलीकडे” या विषयावर पल्स 2026 अंतर्गत जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी पारंपरिक मल्टिपल चॉईस (एमसीक्यू) परीक्षांपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची गरज अधोरेखित केली. केवळ सैद्धांतिक ज्ञानावर आधारित परीक्षा पुरेशा नसून, प्रत्यक्ष परिस्थितीत निर्णयक्षमता, संवाद कौशल्य, तणावात काम करण्याची क्षमता आणि रुग्णांशी वागण्याची पद्धत यांचेही मूल्यमापन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

या चर्चासत्रात ग्रँड मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय रंधारवर, डॉ गौतम खन्ना, मेट्रोपोलिस फौंडेशनच्या अध्यक्ष, डॉ. दुरू शाह, उत्तर प्रदेशच्या केजिएम्यू च्या वैद्यकीय शिक्षण विभाग प्रमुख आणि नर्सिंग च्या अधिष्ठाता डॉ. अमिता पांडे आणि ग्लोबल ऐंग्जेमेंट अँड एज्युकेशन युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे प्रा. डॉ. पृथ्वी सुकुमार यांनी सहभाग घेतला.

चर्चेत ओएससीई, सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण, डिजिटल साधने आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन या पद्धतींचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष कामासाठी तयारी अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच, भारतात कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन (सीबीएमई) सुरू झाल्यानंतर काही सकारात्मक बदल झाले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे प्रभावीपणे झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले. विशेषतः शिक्षण आणि मूल्यमापन यामधील विसंगती दूर करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.

डिजिटल लॉगबुक, राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नसंच, प्रशिक्षित परीक्षक आणि प्रादेशिक मूल्यमापन केंद्रे उभारण्याचे सुचविण्यात आले. यामुळे देशभरात एकसमान आणि विश्वासार्ह मूल्यमापन प्रणाली विकसित होऊ शकते, असे मत मांडण्यात आले.

या चर्चासत्रातून वैद्यकीय शिक्षण अधिक व्यावहारिक, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी मूल्यमापन पद्धतीत व्यापक सुधारणा आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

कंत्राटी स्वरुपात मानसोपचार तज्ञ पदाकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद**१०२ जणांची आरोग्य तपासणी; ५० जणांचे रक्तदान, १५ जणांची अवयवदानासाठी नोंदणी*

vishwatmaklokswamivarta

प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची आकस्मिक भेट,आरोग्य सेवांचा आढावा; गुणवत्तापूर्ण व वेळेत सेवा देण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कार्यक्रम आरोग्य शिबिरात २५० डॉक्टरांच्या पथकाद्वारे भाविकांची मोफत तपासणी व उपचार; पहिल्याच दिवशी सुमारे साडेपाच हजार जणांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta

अटाळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न ;‘अधिक उपचार, कमी रेफरल’ संकल्पनेवर भर; आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण