vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माथेरान-नेरळ घाट रस्त्यावर जड-अवजड वाहनांना बंदी सोमवार ते गुरुवारच रस्ता दुरुस्तीची कामे; जीवनावश्यक सेवांना सूट

माथेरान-नेरळ घाट रस्त्यावर जड-अवजड वाहनांना बंदी सोमवार ते गुरुवारच रस्ता दुरुस्तीची कामे; जीवनावश्यक सेवांना सूट

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : माथेरान-नेरळ-कळंब रस्ता (एसएच-१०९) किमी ०+०० ते किमी २०+४०० पर्यंतच्या रस्ता सुधारणा कामासाठी तात्पुरती वाहतूक वळविणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी सदर मार्गावर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत (MSIDC) माथेरान-नेरळ-कळंब रस्त्याच्या सुधारणेची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रकल्पांतर्गत माथेरान ते नेरळ दरम्यानचा घाटमाथ्यावरील रस्ता अरुंद, तीव्र उताराचा व धोकादायक वळणांचा असल्याने बांधकामाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवणे कठीण होणार असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

पोलीस प्रशासनानेही माथेरान हे प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने शनिवार, रविवार तसेच सलग सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असल्याचे नमूद केले आहे. माथेरानमध्ये प्रवेशासाठी नेरळ-माथेरान घाट रस्ता हा एकमेव मार्ग असून, दस्तुरी नाका येथील पार्किंग क्षमता मर्यादित असल्यामुळे अनेक वाहनचालकांना घाट रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढत असल्याचे अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीची कामे शनिवार, रविवार तसेच सलग सुट्ट्यांच्या दिवशी न करता केवळ सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काम सुरू असताना सदर मार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ· अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा…

शेगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 108 सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न..

vishwatmaklokswamivarta

महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठकीत घेतला पावसाळी स्थितीचा सविस्तर आढावा 

मुंबई महानगरपालिकेने दोनशे सत्तावीस प्रभागांच्या नव्या रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

महापौर सौ.सुजाता पाटील यांनी घेतला घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील जलस्थितीचा आढावा

युवकांसाठी ‘अमृत चे’ ड्रोन प्रशिक्षण; परवानाही मिळणार खुल्या प्रवर्गाच्या आर्थिक दुर्बल घटकातील युवकांनी अर्ज करावेत