vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

जालना : प्रतिनिधी  मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्स या मराठवाडा व्यापी संघटनेचा येत्या 20 जुलै रविवार रोजी 28 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त मराठवाड्यातील सर्व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे ,तर चेंबरचे वरिष्ठ मार्गदर्शक सत्यनारायण लाहोटी व व्यापार परिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष मानसिंह पवार उपस्थित राहणार आहेत. या व्यापारी परिषदेत मराठवाड्यातील विविध व्यापारी संघटनेचे जवळपास तीनशे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या परिषदेत मराठवाड्यात व्यापार /उद्योग करताना येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात येणार असून काही ठराव घेण्यात येणार आहे. राज्यात मराठवाडा विभाग हा मागासलेला विभाग म्हणून परिचित आहे. तसे पाहता मराठवाड्यात पर्जन्यमान कमीच असते. त्यामुळे पाण्याचा नेहमीच अभाव असतो ज्यामुळे व्यापारी/उद्योजक वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शासनाचे विविध कर भरून सुद्धा मराठवाड्यातील व्यापारी/ उद्योजकाला विशेष सुविधा मिळत नाही. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र सरकारने संपूर्ण मराठवाड्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. पण असे काही होत असताना दिसत नाही. जीएसटी रचना आल्यानंतर वन नेशन वन टॅक्सची घोषणा करण्यात आली तरी आजही औचित्य नसलेले कर व्यापारी वर्गावर लादले जातात. त्याविरुद्धही या परिषदेचे माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे . इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात विजेचा दर जास्त असल्याने उत्पादन व विक्री किंमत वाढत असल्यामुळे इतर राज्याच्या उद्योजकांच्या स्पर्धेत येथील उद्योग टिकत नाही . तसेच वीज नियामक आयोगाने सोलार उत्पादित विद्युत वर आणलेली बंधने या विषयावर ही या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील व्यापारी/ उद्योजक वर्गाच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी व या विभागातील व्यापारी/ उद्योजकांचे प्रश्न जाणून त्यांना योग्य ती मदत करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

एमएसएमई ॲवार्ड 2026′ साठी विविध 9 प्रवर्गांमध्ये नामांकने आमंत्रित

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले. सदर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नियोजनाबाबत विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच पाटण्यात