vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धानामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी…

21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धानामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी…

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दि. 21 ते 23 मार्च 2025 रोजी वाशीमध्ये ‘नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा 2024 – 25’ चे आयोजन करण्यात आलेले असून या माध्यमातून राज्यातील नामांकित व्हॉलीबॉल संघ आपले कौशल्य प्रदर्शित करणार आहेत.

 महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी यांच्या सहयोगाने संपन्न होणा-या या 3 दिवसीय स्पर्धेत 16 पुरूष व 8 महिला संघांतील अत्यंत नामवंत व राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असणा-या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी नवी मुंबईकरांना प्राप्त होणार आहे.

   या स्पर्धा शुक्रवार, दि. 21 मार्च पासून रविवार, दि. 23 मार्च, 2025 पर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (मॉडर्न कॉलेज), वाशी येथे संपन्न होणार असून स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह तसेच वैयक्तिक सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

   या राज्यस्तरीय स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार, दिनांक २१ मार्च २०२५ रोजी, सायं. 6 वा. तसेच पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 23 मार्च 2025 रोजी, सायं. 7 वा. संपन्न होणार आहे. तरी नवी मुंबईमधील तमाम क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धांच्या निमित्ताने नवी मुंबईत येणा-या नामवंत व्हॉलिबॉलपटूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

वाहन चालकांसाठी मोठी बातमी -वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

कामगारांच्या कल्याणातून घडतोय समृद्ध महाराष्ट्र ! १ मे कामगार दिनानिमित्त लेख….

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून  सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती