vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

 

        सांगली, प्रतिनिधी : सांगली, मिरज या ठिकाणी दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 एकूण 20 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजीचे सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

 आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर, नेण्यास मनाई केली आहे.

     हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे — डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ,रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार