vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शहरातील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. रविवारी (दि.२) पारितोषिक वितरण झाले. या संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांद्वारे आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले.

  आदिवासी चित्रकला, नृत्य, भाषण, सामान्य ज्ञान, वक्तृत्व स्पर्धा यासह कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

  बक्षिस वितरण सोहळ्यास साई महाशब्दे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. उद्धव वायाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, ‘स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि शिक्षणासोबत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा’. स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी गृहप्रमुख कुलकर्णी मॅडम, आखरे मॅडम, रामटेके मॅडम, राऊत मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.०००००

संबंधित पोस्ट

अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता भासू देणार नाही- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा*

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर