vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी: ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि. 13 व 16 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दि. 17 जून 2025 रोजीच्या सुधारित अधिसूचनेनुसार बुलडाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे आरक्षण सोडत 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा निवडणूक इमारत, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

या सभेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासोबतच अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागास प्रवर्ग महिला व खुल्या प्रवर्ग महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

या महत्त्वाच्या प्रक्रियेस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान….राज्य श्रेणीत महाराष्ट्र तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगर पालिका सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 15 हजार दंड वसूली व 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रासायनिक दुर्घटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक; ३०० जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

मेडिकलमध्ये आता रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकारआशियातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाचा कॉर्पोरेट लूक…

vishwatmaklokswamivarta