vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

 

मुंबई प्रतिनिधी-अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जॅकलीनची आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.

 जॅकलीनची आई किम यांना 24 मार्च रोजी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, आईची तब्येत बिघडल्यामुळे जॅकलीनने कामातून ब्रेक घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ती आईसोबत हॉस्पिटलमध्ये होती. तिची काळजी घेत होती.

आईची तब्येत बिघडल्याने आयपीएलचा इव्हेंट सोडला होता जॅकलिन फर्नांडिस काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये परफॉर्म करणार होती. 26 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याच्या उद्घाटन समारंभात ती डान्स परफॉर्मन्स देणार होती. यासाठी सर्व तयारीही करण्यात आली होती, मात्र आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जॅकलिनने आयपीएलमध्ये परफॉर्म करण्यास नकार दिला

दरम्यान आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्राला भेट देत केंद्रीय वस्त्र मंत्रालय सचिव श्रीम. नीलम शमी राव यांच्याकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज-पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी