vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्राला भेट देत केंद्रीय वस्त्र मंत्रालय सचिव श्रीम. नीलम शमी राव यांच्याकडून प्रशंसा…

टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्राला भेट देत केंद्रीय वस्त्र मंत्रालय सचिव श्रीम. नीलम शमी राव यांच्याकडून प्रशंसा…

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत वस्त्र समितीच्या माध्यमातून टाकाऊ वस्त्रावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प देशात प्रथमत: सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे राबविण्यात येत असून या प्रकल्पास भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या सचिव श्रीम. नीलम शमी राव यांनी भेट देत प्रकल्पाची पाहणी केली व चांगले काम सुरु असल्याबद्दल प्रशंसा केली.

          याप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्र सरकारच्या वस्त्र आयुक्त डॉ. एम.बीना, केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाचे संचालक श्री. अशोक जयस्वाल, वस्त्र समितीचे सचिव श्री. कार्तिकेय धांडा उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे तसेच वस्त्र समितीचे संचालक डॉ. तपन रौत आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

          नवी मुंबई महानगरपालिकेने टाकाऊ वस्त्रावर पुनर्प्रक्रिया करणारा अभिनव प्रकल्प प्रायोगिकरित्या सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला व तो यशस्वीपणे राबवित असल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व त्यांच्या सर्व सहका-यांचे अभिनंदन करीत केंद्रीय सचिव श्रीम. नीलम शमी राव यांनी देशातील इतरही शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प सुरु केले जावेत असे मत व्यक्त करीत याबाबतची कार्यशाळा नवी मुंबईत आयोजित केली जावी असे सूचित केले.

          याप्रसंगी प्रकल्पस्थळी येणा-या कापडी कच-याच्या सहा प्रकारे वर्गीकरणाच्या पध्दती त्यांनी जाणून घेतल्या तसेच कपडा कोणत्या प्रकारचा आहे याची यांत्रिक चाचणी कशा रितीने होते याचीही पाहणी केली. नागरिकांकडून टाकून देण्यात आलेले कपडे व कापड हे प्रकल्पस्थळी प्रक्रिया करुन आकर्षक स्वरुपात पुननिर्मित केले जात असल्याचे पाहून त्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे त्याठिकाणी काम करणा-या महिलांशी संवाद साधतांना त्यांना या कामापासून रोजगार उपलब्ध होतोच शिवाय आपण काहीतरी नावीन्यपूर्ण निर्मिती करतो याचा आनंद देखील या महिलांना मिळतो याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

          सद्यस्थितीत मोठया सोसायट्या, मॉल, कार्यालये अशा वर्दळीच्या ठिकाणी टाकाऊ वस्त्र संकलनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने एस.बी.आय. फाउंडेशन लि. यांच्या मदतीने व टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमार्फत मोठया पेट्या ठेवण्यात आल्या असून टाकाऊ वस्त्राचे संकलन करणेकरिता स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी असलेले थ्री आर सेंटर्स व या पेट्यांमधून टाकाऊ कपडे संकलीत करण्यात येत असून ते बेलापूर येथील शकुंतला महाजन बहुउद्देशीय इमारत, से.2, सीबीडी बेलापूर या ठिकाणी सुरु असलेल्या टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्रस्थळी आणण्यात येत आहे.

          या कार्यवाहीत टाकाऊ कपडे देण्यासाठी उत्तम योगदान देणा-या सीवूड इस्टेट फेज 1 बेलापूर, ओम् सिध्दी टॉवर सोसा. सेक्टर 27 नेरूळ आणि नेक्सस सीवूड मॉल सेक्टर 42 सीवूड या तीन संस्थांचा यावेळी सचिव महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

             या प्रकल्पाठिकाणी टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने चांगल्या स्वरुपातील टाकाऊ वस्त्रांचे विलगीकरण करून हॅन्डलूमच्या सहाय्याने अप – सायकलींग करण्यात येत आहे. या प्रक्रियेत टाकाऊ कपड्यापासून विविध प्रकारच्या वस्तूंची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे बाजारपेठेत प्रदर्शन करण्यात येत असून त्यांच्या विक्रीलाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. हा प्रकल्प राबविल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी जाणा-या कच-याचा भार काही अंशाने कमी होत असून कचरा कमी करण्याप्रमाणेच महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे.

          वापरुन झाल्यानंतरच्या कपडे व कपड्याचे व्यवस्थापन करण्याचा हा अभिनव प्रकल्प राबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची देशातून निवड करण्यात आली असून या उल्लेखनीय प्रकल्पाची प्रशंसा येथे भेट देणा-या विविध मान्यवरांनी व या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. आज केंद्र सरकारच्या भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या सचिव श्रीम. नीलम शमी राव यांनी प्रकल्पाची पाहणी करतांना या प्रकल्पाव्दारे कापडाचा कचरा कमी करुन त्या कपड्यावर पुनर्प्रक्रिया केल्याने त्यामधून कच-याचे शाश्वत व्यवस्थापन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत सुपर स्वच्छ सिटी म्हणून नावजल्या जाणा-या नवी मुंबईतील हा प्रकल्प इतर शहरांसाठीही अनुकरणीय असल्याचे नमूद केले.

0000000

संबंधित पोस्ट

स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव टेकसागर- २०२६ एआय हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात-पिल्ले कॉलेज प्रथम, तर तासगावकर महाविद्यालयातील वेदांत कायंदेकर यांच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली

vishwatmaklokswamivarta

रंगानुभूति’ सारख्या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडची ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून ओळख निर्माण होतेय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!