vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – ज्येष्ठ शिक्षक आणि शिंदे गटाचे ग्रामीण नेते आबासाहेब पाटील भोसले यांची सदिच्छा भेट अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी करमाड येथे घेतली. दौऱ्यावर असताना भोसले यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. शेतकरी पुत्र म्हणून दोघांचीही भूमिका शेतकऱ्यांसाठी सक्षम निर्णय घेण्याच्या दिशेने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रातील अडचणी, मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांचे हक्क, बाजारपेठेतील समस्या आणि धोरणात्मक बदल यासारख्या मुद्द्यांवर चिंतन करण्यात आले.

शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेविषयीची माहिती भोसले पाटील यांना दिली. संघटनेचे महाराष्ट्रात सध्या जाळे वेगाने विस्तारत असून लवकरच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकरी हा संघटनेचा केंद्रबिंदू असून, त्यांच्यासाठी काय करता येईल यावर लवकरच एक व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत धोरणात्मक चर्चा करून भविष्यातील दिशा निश्चित केली जाणार आहे.

शिवाजीराव सोळुंके पाटील व आबासाहेब भोसले यांची ही भेट शेतकरी प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दोघांचीही कार्यपद्धती शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने या चर्चेला स्थानिक पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित पोस्ट

आज 26 वा कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ प्रकरणे पात्र- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र…

जिल्ह्यात इयत्ता बारावी परिक्षेत कॉपीचे 11 गैरप्रकार

vishwatmaklokswamivarta

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण..

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…