vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश

 

गडचिरोली प्रतिनिधी: : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आज भेट देऊन रुग्णालयातील विविध विभाग आणि सुविधा यांची पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांबाबत माहिती घेतली. त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक विभाग, अपघात विभाग, ट्रॉमा वार्ड, बाह्य रुग्ण विभाग, डायलेसिस युनिट, केमोथेरपी विभाग, ऑक्सीजन प्लांट आणि औषध भांडार यासह रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी आकस्मिक आणि अपघात विभागातील उपलब्ध उपकरणे आणि सुविधा तपासून पाहिल्या. बाह्य रुग्ण विभागातील औषध पुरवठा व त्याची वैधता याबाबत सविस्तर चर्चा केली आणि औषधीची वैधता व त्यांचे परवाने प्रमाणपत्र तपासूनच पुरवठा करण्याचे निर्देश दिले.

एनसीडी विभागामध्ये तपासणीसाठी शुगर आणि रक्तदाब तपासणी किट उपलब्ध असल्याची खात्री केली. दंत चिकित्सा विभागामध्ये उपलब्ध रूट कॅनल, बॉयोप्सी आदी सेवा तसेच उपकरणांची कार्यक्षमता तपासली. रुग्णालयाच्या ऑक्सीजन प्लांटची माहिती घेऊन त्याच्या कार्यक्षमतेची खात्री केली.

याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील डायलेसिस युनिटच्या विस्ताराची आवश्यकता ओळखून तालुकास्तरावर अधिक खाटांची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव सुचवला.

 यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयात मेडिकल स्टोअर निर्माण करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठात्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत उपविभागीयअधिकारी राहुल मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी एच. विके (किलनाके), तसेच सामान्य रुग्णालयातील प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. मनिष मेश्राम, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाहय संपर्क )बागराज धुर्वे, तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार 

खानापूरच्या गणेश बुरूजाचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आदेश सुपूर्द- पुरातन बुरूजाच्या सुशोभिकरणातून शहराच्या वैभवात भर- देखभाल, दुरूस्तीसह वृक्षारोपणाची अट…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार…

डॉ.आंबेडकर सभागृहात आज (दि.८)पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

उद्योजकतेची नवी पहाट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये बदल*