vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांचीेफेरनिवडशहराध्यक्षपदी सुहास वैद्य तर शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती

पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांचीेफेरनिवडशहराध्यक्षपदी सुहास वैद्य तर शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती

जालना । प्रतिनिधी – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी सुहास वैद्य व शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती करण्यात आली असून फेरनिवड व नियुक्तीचे पत्र राज्य सरचिटणीस महेश जोशी व विजयकुमार सकलेच्या यांच्या हस्ते देण्यात आले.

गेल्या तीन वर्षातील पीसीएमच्या जालना जिल्ह्यातील कार्याची दखल घेत पुन्हा दीपक शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या मागील कार्यकाळात पीसीएमच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. पत्रकार व वृत्तपत्रांच्या मागण्या शासन दरबारी लावून धरण्यात आल्या. विविध आंदोलने त्यांच्या नेतृत्त्वात केल्या गेली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ढोल बजाओ आंदोलनही त्यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. जिल्ह्यातील विविध पत्रकारांसह इतर संघटनांच्या प्रमुखांना सोबत घेऊन त्यांनी जिल्हा कृती समिती तयार करून विविध प्रश्‍न शासन दरबारी मांडले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

त्यांच्या फेरनिवड व नियुक्तीबद्दल दीपक शेळके, सुहास वैद्य व शेख ईस्माइल यांचे माजी आ. कैलास गोरंट्याल, शेख माजेद, दत्ता घुले, महेश जोशी, विजयकुमार सकलेचा, ज्ञानेश्‍वर ढोबळे, धनसिंह सुर्यवंशी, भरत मानकर, विष्णु कदम, गणेश काबरा, दर्पण सकलेचा, शेख उमर, संदीप भाकरे, शेख नबी सिपोराकर, नरेंद्र जोगड, बद्री उपरे, संतोष भुतेकर, बाबासाहेब गाडेकर, योगेश पिछाडे, राहुल भालके, आनंद जाधव, उमेश केंधळे, मनोज घडे यांच्यासह पत्रकारबांधवांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

जीएसटी अभय योजना; लाभ घेण्याचे आवाहन कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अर्ज दाखल करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत..

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

बारामती विधानसभा पोटनिवडणुकरिता २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण होणार !· मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये-प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन