vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जीएसटी अभय योजना; लाभ घेण्याचे आवाहन कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अर्ज दाखल करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत..

जीएसटी अभय योजना; लाभ घेण्याचे आवाहन कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अर्ज दाखल करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये जीएसटी करदात्यांसाठी मोठा दिलासा देत ‘जीएसटी अभय योजना २०२४’ जाहीर केली आहे. यानुसार, २०१७ ते २०२० या आर्थिक वर्षांसाठी जीएसटी कराचे वाद मिटवण्यासाठी ही विशेष सवलत योजना लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याकरीता ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य कर सहआयुक्त अभिजीत राऊत यांनी केले आहे.

ही योजना कलम ७३ आणि १२८ अ अंतर्गत लागू केली असून, करदात्यांनी ठराविक मुदतीत रक्कम भरल्यास व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.

कोण लाभ घेऊ शकतो?२०१७-१८, २०१८-१९ आणि २०२१९-२० या आर्थिक वर्षांत कलम ७३ अंतर्गत कर थकबाकी असलेल्या करदात्यांसाठी ही योजना लागू असेल.ज्या प्रकरणांमध्ये कलम ७४ अंतर्गत नोटीस किंवा आदेश जारी झाला आहे आणि तो अंतिम नाही, अशा प्रकरणांसाठीही ही योजना लागू करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा,३१ मार्च २०२५ – जीएसटी कराची थकबाकी भरण्याची अंतिम तारीख.३० जून २०२५ – अमनेस्टी योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत.अर्ज कसा कराल?ही योजना पूर्णपणे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे राबवली जाणार असून, करदात्यांना संबंधित पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावा लागेल.

अधिक माहितीसाठी संपर्कया योजनेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर जीएसटी विभागाशी संपर्क साधावा, असे राज्यकर सहआयुक्त छत्रपती संभाजीनगर अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

इग्नाईट कन्व्हेन्शनमधून मुंबई उपनगराच्या उद्योजकता विकासाला नवी दिशा

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावाअतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे विधानपरिषदेत निवेदन

आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – डॉ. ओमप्रकाश शेटे

vishwatmaklokswamivarta

सी- व्हिजील’ वर नागरिक सजग महिनाभरात १६३ तक्रारी प्राप्त; १४३ ची सोडवणूक..