vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार *दादर येथे विशेष गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन**राष्ट्र-धर्म रक्षणासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा !* – सनातन संस्थेचे आवाहन

*सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार *दादर येथे विशेष गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन**राष्ट्र-धर्म रक्षणासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा !* – सनातन संस्थेचे आवाहन

 

  राज्य प्रतिनिधी *मुंबई* – हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे; परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचे सावट पसरले आहे. अशा काळात धर्माच्या बाजूने उभे राहणे, हाच साधनेचा आणि मुक्तीचाही सर्वोच्च मार्ग आहे. ही जाणीव प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी आणि धर्म-राष्ट्रासाठी कर्तव्यनिष्ठा जागवण्यासाठी *गुरुवार, १० जुलै २०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.* यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात ७७ ठिकाणी, तर *मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत दादर, कोपरखैरणे, पनवेल, उरण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाणे येथे २ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव होणार आहेत*. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.   प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्म आणि न्यायाच्या बाजूने लढणार्‍यांपेक्षा अधर्मींची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला, कारण भगवंताचा आशीर्वाद हा धर्माच्या बाजूने लढणार्‍यांसाठीच असतो. आजही परमकल्याणकारी गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे.*सनातन संस्थेच्या वतीने पुढील ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.* आज*गुरुवार १० जुलै २०२५*

१. प्राचार्य बी.एन. वैद्य सभागृह,२ रा मजला, राजा शिवाजी विद्यासंकुल,गेट क्र. १२,पाटकर गुरूजी चौक,हिंदू कॉलनी, *दादर (पू.) (सायं. ६.०० वा.)*

२. कै. अण्णासाहेब पाटील मेमोरियल हॉल, लोकमान्य टिळक कॉलेजच्या समोर, सेक्टर ५, *कोपरखैरणे, नवी मुंबई (सायं. ६.०० वा.)*

३. श्री आई माता मंदिर सभागृह, वीर सावरकर नगर, *ठाणे (प.) (सायं. ६.०० वा.)*

४. सी.के.पी हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या शेजारी, कोर्ट नाका, *ठाणे (प.) (सायं. ६.०० वा.)*५. शुभमंगल सभागृह, रेल्वे स्थानकाजवळ, *डोंबिवली (पू.) (सायं. ६.०० वा.)*

६. काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, *बदलापूर (पू.) (सायं. ५.३० वा.)*७. श्री बँक्वेट्स, सेक्टर १/एस, प्लॉट नंबर ११३ आणि ११४, शबरी हॉटेलच्या मागे, *नवीन पनवेल. (सायं. ५:३० वा.)*८. श्रीराम मंदिर हॉल, गणपती चौक, बाजारपेठ, *उरण (सायं. ५:०० वा.)*    या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण; रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ; समाज, राष्ट्र आणि धर्म विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन; तसेच ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयांवर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याव्यतिरिक्त धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शनही महोत्सवस्थळी लावण्यात येणार आहे.*शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन* : विशेष आकर्षण म्हणून प्राचार्य बी.एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, *दादर (पू.)* आणि सी.के.पी हॉल, कोर्ट नाका, *ठाणे (प.)* येथील गुरुपौर्णिमा महोत्सवांत *शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन* लावण्यात येणार आहे. तरी अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.*‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’* – देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ मिळावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ व मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. *१० जुलैला सायं ५.३० वा. मराठी भाषेतील महोत्सवाचा लाभ पुढील लिंकवरून घेता येईल* : Sanatan.org/mr/gurupurnima

धर्म, राष्ट्र आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपेकडे वळा आणि गुरुपौर्णिमा महोत्सवात सहकुटुंब सहभागी व्हा !श्री. अभय वर्तकप्रवक्ता, सनातन संस्था(संपर्क क्रमांक : 9987922222)

संबंधित पोस्ट

एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

बहार-ए-उर्दू’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम

मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत…

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख कारभारातूनच विकासाला गती मिळते : राज्यमंत्री योगेश कदम • मेहकरमधील विविध विकासकामांचे लोकार्पण