vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

माविमची साथ आणि परिश्रमाच्या जोडीतून अगरबत्ती उद्योगाचा दरवळ

माविमची साथ आणि परिश्रमाच्या जोडीतून अगरबत्ती उद्योगाचा दरवळ

छत्रपती संभाजीनगर,- पैठण तालुक्यातील ईसरवाडी येथील वर्षा अशोक ढाकणे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनातून अगरबत्ती व्यवसाय उभारून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे.

वर्षा ढाकणे या स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या सदस्य असून त्यांचे कुटुंब दोन मुली व एक मुलगा असे आहे. पती कंपनीत नोकरीला असून त्या स्वतः मजुरी करत होत्या. मात्र या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला केवळ १६०० रुपयांमध्ये अगरबत्तीचा कच्चा माल आणून त्यांनी छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मशीन घेण्याचा विचार केला. यासाठी आवश्यक भांडवल नसल्याने त्यांनी माविम अंतर्गत एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गट स्थापन केला.

गटातून अंतर्गत कर्ज मिळाल्यानंतरही मोठ्या गुंतवणुकीसाठी अधिक निधीची गरज होती. यासाठी साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आयसीआयसीआय बँकेकडून सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. या निधीतून त्यांनी अगरबत्ती तयार करण्यासाठी मशीन, मिक्सर व ड्रायर खरेदी करून उत्पादन सुरू केले.सध्या त्यांच्या उद्योगातून दररोज ३० ते ५० किलो अगरबत्ती उत्पादन होते. वाढत्या मागणीमुळे त्यांनी घाऊक विक्रीही सुरू केली असून महिन्याला सुमारे २००० किलो उत्पादन केले जाते. या व्यवसायातून त्यांना दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

या उत्पन्नातून त्यांनी अडीच एकर शेती तसेच एक प्लॉट खरेदी केला आहे. आज त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या असून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

माविम आणि एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या वेळेवर मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याचे त्या सांगतात. महिलांनीही उद्योगधंद्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण सुधारित कार्यक्रम जाहीरसांगली जिल्ह्यात 93.98 टक्के मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- बीएलओमार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 17 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार- नागरिकांना मतदार यादीतील माहिती अचूक राहण्यासाठी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन

दिल्ली स्फोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा, स्फोट झालेल्या गाडीत डॉ.उमर असल्याचं डीएनए टेस्टवरुन झालं स्पष्ट

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन**मुला मुलींच्या परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या**- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन* 

vishwatmaklokswamivarta

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे -उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन