
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून पारदर्शकपणे गतीने काम करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्सचे वितरण
सांगली, प्रतिनिधी : सामान्य माणसांची कामे गतीने व विहित वेळेत व्हावी, त्याला त्रास होऊ नये यासाठी आपण महसूल मंत्री असताना प्रथम ई-सातबारा सुरू केला. शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन त्यादृष्टीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीने चांगले काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.



